जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर हुडको परिसरातील गरजूंनी येणारा रमजान सण थाटात साजरा करण्यासाठी समाजवादी पार्टीतर्फे कपडे व सुका मेवा वाटप करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने महाराष्ट्र शासनाने दि. १५ मे २०२१ पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यादरम्यान सर्व धार्मिक सण साजरा करण्यास शासनाने निर्बंध लावले आहे. तसेच धार्मिक स्थळांमध्ये पूजा पूजाअर्चा करण्यासाठी दोन ते तीन जणांना वगळण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात एकत्र जमा करून साजरे करण्यास बंदी लावण्यात आली असून आपापल्या घरी साजरे करण्याची मुभा शासनाने दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू वगळता बाकी दुकानेपणे बंद ठेवण्यात आल्याने मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा परिवार पैशा अभावी येणारे सण आपल्या परीवारासोबत साजरे करू शकत नाही. अशा गरजूंना समाजवादी पार्टीचे जळगाव जिल्हा निरीक्षक शेख मोहिनुद्दीन इक्बाल यांच्यातर्फे कोरोना काळात ५० गरीब हात मजूर व लहान मुलांना रमजान साजरा करण्यासाठी नवीन ड्रेस व शीरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारा सुकामेवा वाटप करण्यात आला आहे. हे वाटप आठ वाजेच्या दरम्यान शिवाजी नगर हडको परिसरात करण्यात आले. यावेळी पाच लहान मुलांना व दहा लहान मुलींना कपडे वाटप व शीरखुर्मा च्या सुकामेवा पॅकेट वाटप करण्यात आले.
समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार अबू हाश्मी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईदनिमित्त हे साहित्य पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद तडवी, प्रशांत झेंडे आदि उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील उद्योजक व व्यापारी आणि समाजसेवा संस्था यांनी पुढाकार घेऊन गरजूंची ईद साजरी कशी होणार यासाठी मदतीचा हात वाढवणे गरजेचे आहे. असे आवाहन जिल्हा निरीक्षक शेख मोहिनुद्दीन इक्बाल यांनी केले आहे.