मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी धर्म बदलल्याचा दावा केला आहे. मलिक यांचा हा दावा समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी फेटाळून लावला आहे. क्रांती रेडकर हिने लग्नाचे फोटो पोस्ट करत मी आणि माझे पती समीर हे जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मपरिवर्तन केल नाही, असं क्रांतीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“मी आणि माझे पती समीर हे जन्माने हिंदू आहोत. आम्ही कधीच धर्मपरिवर्तन केलं नाही. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो. समीरचे वडीलसुद्धा हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं. पण त्या म्हणजेच माझ्या सासू आता हयात नाहीत. समीरने विशेष विवाह कायद्याअंतर्गत पहिलं लग्न केलं होतं. २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आमचं लग्न २०१७ मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार पार पडलं, असं स्पष्ट करत क्रांतीने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखल ट्विट केला असून “समीर दाऊद वानखेडे इथपासून हा फर्जीवाडा सुरू झाल्याचं म्हटलं होतं. “माझं पहिलं लग्न डॉ. शबाना कुरेशी यांच्यासोबत २००६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. २०१७ मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर मी क्रांती रेडकरशी विवाह केला” अशी माहिती वानखेडे यांनी पत्रातून दिली आहे.