चोपडा (प्रतिनिधी) जळगाव येथून मिटिंग आटपून येत असताना अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनावर चालकाने ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडगाव गावाजवळ घडली. यात प्रांताधिकाऱ्यांचे वाहनाचे नुकसान होऊन त्यांच्या ते किरकोळ जखमी झाले आहे. तर तलाठी यांनाही ट्रॅक्टर चालकाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, चोपडा येथील प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे हे जळगावला मीटिंग संपवून दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास भोकर -खेडीभोकरी मार्गे चोपड्याकडे येत होते. यावेळी त्यांना अवैधरित्या वाळू भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी खडगाव जवळ तलाठी गुलाबसिंग पावरा यांना पुढे माहिती देऊन ट्रॅक्टर थांबविण्याच्या सूचना दिल्यात. परंतू ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर न थांबवता तलाठी पावरा याना शिवीगाळ करत ट्रॅक्टर पुढे घेऊन जात होता.
यावेळी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे यांनी ट्रॅक्टरच्या पुढे स्वतःच्या ताब्यातील कार (एमएच -२० एफ वाय ०२१६) उभी केली असता चालक राजेश विकास मालवे (रा. खरग ता चोपडा) याने ट्रॅक्टरला (एमएच १९-बी जी ८०७६) गाडीला मागून जबर धडक दिली. या धडकेत प्रांताधिकारी यांची गाडी मागून ठोकली जाऊन तिचे नुकसान होऊन प्रांताधिकारी यांच्या उजव्या हाताच्या बोटाला देखील दुखापत झाली. याप्रकरणी प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे याच्या फिर्यादी वरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर वरील चालक राजेश विकास मालवे व मालक सुरेंद्र कोळी (रा. चोपडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ किरण पाटील करीत आहेत.