अमळनेर (प्रतिनिधी) मागील काही काळापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन पूर्णपणे बदललेले आहे. यातच प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेला प्राधान्य देतांना दिसून येत असून नुकतेच दहिवद ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
यात प्रामुख्याने गावासाठी पाणीपुरवठा होत असलेल्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करण्यात आली.आपल्याकडे बरेच आजार अशुद्ध पाणी आणि स्वच्छतेमुळे होतात हीच बाब लक्षात घेऊन दहिवद ग्रामपंचायत ने हा उपक्रम राबविला. यावेळी पाणीपुरवठा कर्मचारी बाळू माळी, भय्या पुजारी, पंकज माळी, विजू दादा यांच्या मदतीने पिण्याची मुख्य पाण्याची टाकी स्वच्छ धुऊन,टी सी एल पावडर टाकून साफ केली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.











