TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतनासाठी तालुक्यांना १३२ कोटी २३ लाखांचे अनुदान वितरीत !

जळगाव जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४ लाभार्थ्यांची दिवाळी होणार गोड !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील सामाजिक विशेष सहाय्याच्या राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व‌ श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४ लाभार्थ्यांच्या निवृत्तीवेतनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १३२ कोटी २३ लाख १६ हजार १९० रूपयांचे अनुदानाचे तालुक्यांना वितरीत केले आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना समाजातील वंचित घटकांसाठी राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या १२००८ लाभार्थ्यांना ५ कोटी २० लाख ८५ हजार १०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील ६९१९२ लाभार्थ्यांना ३० कोटी २४ लाख २४ हजार १०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या ९०१५ लाभार्थ्यांना ४ कोटी १ लाख ७२ हजार ७०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

READ ALSO

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

जिल्ह्यातील श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या १९६५२ लाभार्थ्यांना ७ कोटी ६९ लाख १४ हजार ९०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याच योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गातील १५३८२० लाभार्थ्यांना ७८ कोटी ९५ लाख ७० हजार ७०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या १६५९९ लाभार्थ्यांना ६ कोटी ११ लाख ४८ हजार ६०० रूपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधार अनुदान या योजनेतंर्गत ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, एचआयव्ही, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनेंतर्गंत ६५ वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्या अथवा रूपये २१ हजारापर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीना निवृत्ती वेतन देण्यात येत असते. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ५० हजार रूपयांची कौटुंबिक उत्पन्नाची अट आहे‌‌. या योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२३ पर्यंतचा लाभ देण्यात आला आहे‌. आज वितरीत करण्यात आलेल्या तरतूदीतून ऑक्टोबर २०२३ महिन्याचे वेतन दिले जाणार आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना एक हजार रुपये देण्यात येत होते. जुलै महिन्यापासून आता दीड हजार रुपये अनुदान मिळत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

दिवसा वीजवापरावर सवलत हवीय? स्मार्ट टीओडी मीटर बसवा!

April 7, 2026
जळगाव

महावितरणकडून ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये विद्युत सुरक्षेचा जागर; केंद्रीय राज्यमंत्री श्री.नाईक यांनी केले कौतुक

April 7, 2026
गुन्हे

जळगावात मॉलिक्युलर डीएनए टेस्टिंग प्रयोगशाळा प्रकरणात १२ कोटींचा गैरव्यवहार? 

April 7, 2026
जळगाव

जिल्हास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निवारणाला गती

April 7, 2026
जळगाव

भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात ; राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

April 6, 2026
जळगाव

सिटी गॅस डिस्ट्रिब्यूशन (CGD) नेटवर्कचा विस्तार : राज्यस्तरीय बैठक संपन्न

April 6, 2026
Next Post

खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळली ; दोन ठार, चार जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग न्यूज : एकनाथराव खडसे आज करणार धमाका ; चार वाजेला घेणार पत्रकार परिषद !

November 30, 2020

स्वदेशीचा स्विकार – विदेशीचा बहिष्कार’ जनजागृती मोहिमेचा जळगावला शुभारंभ

August 8, 2025

पनवेल येथील नाव्हाशेवा पाणीपुरवठा टप्पा तीनचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन !

February 22, 2021

ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा विचित्र अपघात, पती-पत्नीसह चुलत बहिण ठार !

October 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group