मुंबई (वृत्तसंस्था) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. राऊत कोठडीत बातम्या पाहतात आणि त्यांचे लिखाणही सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय राऊत यांचा ऑर्थर रोड कारागृहातील कैदी नंबर 8959 असा आहे. कारागृहात राऊत सध्या पुस्तकं वाचणं आणि बातम्या पाहण्यात आपला वेळ घालवत आहेत. बातम्यांच्या माध्यमातून ते आजूबाजूच्या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. राऊत यांना कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना घरचे जेवण आणि औषध पुरवली जात आहेत. तसेच राऊत यांनी जेलमधील स्टोरमधून एक वही व पेन घेतला आहे. वर्तमानपत्रातील बातम्यांच्या आधारे संजय राऊत वहीत आपले विचार लिहित असल्याचे कळते. मात्र ते लिखाण बाहेर छापण्यासाठी दिले जात नाही.