धरणगाव प्रतिनिधी । येथील आज महात्मा फुले हायस्कूल या शाळेला सुवर्ण महोत्सव 50 वर्ष प्रसंगी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान देविदास महाजन यांच्या कडुन शाळेला 7 महापुरुषांच्या प्रतिमा शाळेच्या हेमंत माळी, पी. डी. पाटील यांना सुपुर्द भेट देण्यात आले.
नवीन पदे नियुक्ती करण्यात आले त्यामध्ये धरणगांव तालुका वैद्यकीय आघाडी अध्यक्ष देवकीनंदन वाघ यांची निवड करण्यात आली धरणगाव तालुका शिक्षक आघाडी अध्यक्ष कैलास वाघ, यांची निवड करण्यात आली. जिल्हा सदस्य पदी कांतीलाल महाजन, तसेच काही शहराच्या पद नियुक्त्या सुद्धा करण्यात आले. योगराज महाजन हे अध्यक्ष स्थानी होते जितेंद्र महाजन, लक्ष्मण महाजन, महेंद्र माळी, विभागाचे संपर्क प्रमुख समाधान माळी, हेमंत माळी, पी. डी.पाटील , विनायक महाजन, समाधान महाजन,अलकेश महाजन, जितेंद्र महाजन चोपडा कार्याअध्यक्ष नरेंद्र माळी , धरणगांव तालुका अध्यक्ष निलेश माळी, दिनेश महाजन, चेतन माळी, जयेश महाजन, गजानन माळी, गुलाब माळी, नितीन महाजन, समाधान माळी, योगेश महाजन, यशोदिप महाजन, निलेश माळी, गणेश माळी,आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र माळी यांनी केले तर आभार विनायक महाजन यांनी मानले.