धरणगांव प्रतिनिधी – धरणगाव शहरातील महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेमध्ये शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव डॉ.सुरेश झाल्टे ( धुळे ), विश्वस्त आबासाहेब विश्वासराव पाटील ( अमळनेर ), विधिकर्ते शिवदास महाजन ( एरंडोल ), भगवान बोरसे , प्रकाश मोरे (दस्केबर्डी ) उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते लोककल्याणकारी राजा “महात्मा बळीराजा ” यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख अतिथींचे सत्यशोधक समाज संघ धरणगाव तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. सुरेश झाल्टे यांनी मातृसत्ताक संस्कृती, कृषी संस्कृती, आपल्या सात आसरा, कुळदैवत, आपली साडेतीन शक्तीपीठ, आपल्या रूढी परंपरा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे. अंधश्रद्धा, कर्मकांड, मध्यस्थी यापासून दूर राहणे, बहुजनांची शोषण करणारी वर्णव्यवस्था अशा विस्तृत विषयांवर मार्गदर्शन केले. सत्यशोधक विश्वासराव पाटील यांनी आपल्याला सत्तेच्या मार्गावर निरंतर चालावे लागेल आणि आपल्या समाजामध्ये जनजागृती करावी लागेल असे प्रतिपादन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लक्ष्मणराव पाटील यांना जन्मदिनाच्या पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी मंगला महाजन, वेणू पाटील, ज्योती पाटील, रुपाली शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव सोनवणे, साहित्यिक मिलिंद बागुल, माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, ओबीसी मोर्चाचे राज्य सदस्य तथा पत्रकार आबासाहेब राजेंद्र वाघ, रेल्वेचे अधिकारी शांताराम तायडे, एरंडोल येथील प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, गोरखनाथ देशमुख, जेष्ठ नेते संजय पाटील, लक्ष्मणराव पाटील, पत्रकार निलेश पवार, ॲड. रविंद्र गजरे, भैया धनगर, मोहित पवार, प्रफुल्ल मराठे यासह बहुजन बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एच डी माळी यांनी मानले













