जळगाव (प्रतिनिधी) सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे महात्मा जोतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन दि. १३ एप्रिल रोजी मंगळवार सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
या कवी संमेलनाचे उद्घाटन माजी कायदामंत्री तथा गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री प्रसिद्ध कायदेतज्ञ रमाकांत खलप यांच्या हस्ते होणार असून कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी, समीक्षक, राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य केशव सखाराम देशमुख हे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उद्योग सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, तसेच प्रमुख अतिथी उदगीर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. राजकुमार मस्के, नगरसेवक प्रा. डॉ. सचिन पाटील उपस्थित राहणार असून कविसंमेलनात मंगेश बनसोड, प्रा.डॉ. यशवंत राऊत, शेषराव धांडे, योगिनी राऊळ, प्रा. डॉ. विजय कुमठेकर, प्रा. डॉ. रमेश ढगे, सुरेश साबळे, प्रा. डॉ. सारिपुत्त तुपेरे, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, प्रा. डॉ. भास्कर पाटील, अ.फ. भालेराव, लतिका चौधरी, प्रा. डॉ. अशोक इंगळे, प्रा. डॉ. मारुती कसाब, भास्कर अमृत सागर, रमेश पवार, विलास मोरे, भारत गायकवाड, वि. दा. पिंगळे, प्रा.बी. एन. चौधरी, अरुण जोशी, प्रा. डॉ. सतीश म्हस्के,अर्जुन व्हटकर, राजेंद्र पारे, महेंद्र गायकवाड, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, दिलीप सपकाळे, प्रा. डॉक्टर सुनील भडांगे, प्रा.डॉ. रुपेश कऱ्हाडे, प्रा. डॉ. प्रदीप सुरडकर, राहुल निकम, प्रा. डॉ. रवींद्र मुरमाडे प्रा. विनोद कांबळे ,वाल्मीक आहिरे, दिनेश चव्हाण, प्रा. डॉ. संजय कांबळे, संजय घाडगे इत्यादी मान्यवर या कविसंमेलनात सहभागी होणार असून कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी डॉ. मिलिंद बागूल करणार आहेत.
या कविसंमेलनात ऑनलाइन उपस्थिती द्यावी, असे आवाहन डी. एम. अडकमोल, विजयकुमार मौर्य, बापूराव पानपाटील, शिरीष चौधरी, अनिल सुरडकर, सुनील सोनवणे, भैय्यासाहेब देवरे, विजय गवले, विजय लुले, शिवराम शिरसाट यांनी केले आहे.