नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बर्याच वेळा लोक अल्प प्रमाणात गुंतवणूक करण्यास संकोच करतात. कारण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास अधिक फायदा मिळेल असा विश्वास लोकांना असतो. परंतु एका योजनेत दररोज १६७ रुपये गुंतवूनही तुम्ही लक्षाधीश होऊ शकता. म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून आपण याचा फायदा घेऊ शकता. जाणून घेऊया या संदर्भात सविस्तर.
म्युच्यूअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (Systematic Investment Plan- SIP)तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. SIP ची खास बाब म्हणजे प्रत्येक महिन्याला छोटी गुंतवणूक करुन एक चांगला रिटर्न तुम्ही मिळवू शकता. जेवढ्या लवकर तुम्ही या योजनेमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात कराल, तेवढा मिळणारा रिटर्न अधिक असतो. एसआयपीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर एक उत्तम रिटर्न तुम्हाला मिळू शकतो, ज्यातून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.
एसआयपीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणुकीचा सल्ला यासाठी दिला जातो जेणेकरून गुंतवणूकदारांना कंपाउंडिंगचा देखील लाभ मिळेल. जर एखादा गुंतवणूकदार १५ ते २० वर्षांसाठी गुंतवणूक करतो तर त्याच्या फायद्याचा रेट अधिक असेल आणि एक उत्तर रिटर्न मिळतो. म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपी सुरू केल्यानंतर हे जरूरी नाही की तुम्ही एका निश्चित काळासाठी गुंतवणूक कराल. तुम्हाला हवं तेव्हा ही गुंतवणूक तुम्ही थांबवू शकता. याने कोणताही दंड आकारला जात नाही.
किती वर्षात होईल करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण?
जर तुम्ही रोज १६७ रुपयांची बचत केली तर महिन्याला हे ५००० रुपये होतात. तुम्हाला दर महिन्याला ५००० रुपये चांगल्या म्युच्यूअल फंडच्या स्कीममध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवायचे आहेत. जर तुमचा पोर्टफोलिओ वार्षिक १२ टक्के रिटर्न देतो तर २८ वर्षात तुम्ही १.४ कोटींपेक्षा जास्त कमावू शकता. तर ३० वर्षात तुमची गुंतवणूक १.८ कोटी होईल तर ३५ वर्षात तुम्ही ३.२४ कोटींचे मालक बनाल.
एसआयपी म्हणजे काय?
SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान मध्ये गुंतवणूकदाराला एक निश्चित रक्कम नियमित रुपाने म्युच्यूअल फंडच्या कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देतात. हा म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग आहे. यामध्ये तुम्हास तुमच्या कमाईमधून छोटीशी रक्कम काढून प्रत्येक महिन्याला म्युच्यूअल फंडचे युनिट खरेदी करावे लागतात. काही वर्षांपर्यंत केलेली ही छोटी गुंतवणूक मोठी रक्कम मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मोठा फायदा म्हणजे यात गुंतवणूकदार गुंतवणूकीच्या बाबतीत शिस्तबद्ध राहतो. दरमहा काही रक्कम बँक खात्यातून म्युच्युअल फंड कंपनीकडे वर्ग केली जाते. तज्ञ्ज म्हणतात की जर आपण एसआयपी काढलात तर आपण कधीही आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करणार नाही. आपणास माहित आहे की निश्चित रक्कम आपल्या खात्यातून दरमहा निश्चित तारखेला जाईल आणि म्युच्युअल फंड कंपनीकडे जाईल. अशा प्रकारे गुंतवणूकीत शिस्त राहते.