चोपडा प्रतिनिधी – पंकज कला महाविद्यालय चोपडा येथे दि.३/१/२०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे डाॕ. किशोर पाठक होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. नंदिनी वाघ ह्या होत्या.या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.आर. अत्तरदे यांचे मार्गदर्शन लाभले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉ . नंदिनी वाघ यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई बाई फुले चे विचार मांडताना सांगितले, शिक्षणामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, स्वत:ला ओळखण्याची संधी मिळते.स्वाभिमानाने जगण्यासाठी शिक्षण करा, शिक्षण हाच माणसाचा खरा दागिना आहे.ज्ञान हा अज्ञानाचा अंधार दूर करणारा दिवा आहे. समाजातील स्त्रियांच्या समस्या सोडविण्यासाठी तरुणींनी अग्रेसर राहणे काळाची गरज आहे . स्ञियांना सन्मानानी जगण्यासाठी सविञीनी आपले आयुष्य खर्च काही केले. शिक्षणाची दारे खुले केले. स्ञी सुधारणेसाठी आहोराञ काम केले. त्यांच्या विचाराचे अवलोकन करावे. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी क्रांतीज्योत म्हणजे सावित्रीबाई फुले या आहेत असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात डाॕ. किशोर पाठक यांनी सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा आढावा घेतला स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी ,विद्यार्थींनी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिलीप गि-हे यांनी केले तर आभार प्रा. अजय पाटील यांनी मानले . तसेच या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षकेत्तर बांधवांनी मोठे परिश्रम घेतले .