जळगाव (प्रतिनिधी) सौ.पा.तु.पाटील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व सौ. पी.टी.पाटील इंग्लिश मीडियम स्कूल खेडी बु. जळगाव या विद्यालयात शाळा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्वक गुलाबपुष्प देऊन औक्षण करण्यात आले व खाऊ वाटप करण्यात आला. विविध प्रकारचे खेळ घेऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देखील देण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन शांताराम तुकाराम पाटील व मुख्याध्यापिका मीनाक्षी नामदेव पाटील व प्राथ मुख्या संतोष पाटील व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.