वरणगाव ता.भुसावळ (प्रतिनिधी) येथील सिद्धेश्वर भागातील तेरा वर्षीय शाळकरी मुलगी ऑर्डनन्स फॅक्टरी हायस्कूल वरणगांव मध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून तिच्या मैत्रिणी सोबत शाळेत जात होती. अपंग व्यक्ती तिचा मोटर सायकल वरून पाठलाग करीत होता. पंधरा दिवसापासून हा प्रकार सुरू होता. तसेच तिच्या अंगावर फुले फेकून व चाकलेट देण्याचा प्रयत्न करून मला तुझा नंबर दे मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणायचा. या प्रकरणी वरणगाव पोलीसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सदर व्यक्ती व त्याच्यासोबत असलेला एक व्यक्ती दोघांनी असाच पाठलाग करून अपंग व्यक्तीच्या सांगण्यावरून या शाळकरी मुलीचा हात पकडला व आमच्या सोबत चल असे म्हणून लज्जा वाटेल असे कृत्य केले यावेळी या मुलीने व तिच्या मैत्रिणीने आरडा ओरड करून मदती साठी इतर मुलांना बोलावले असता धिरज तांबे नावाच्या मुलाने तिची सोडवणूक केली.
घटना घडल्यावर सदर दोन्ही व्यक्ती निघून गेले असता ते विल्हाळे गावाकडे गेल्याचे समजले. मुलीच्या मामाने त्यांचा शोध घेतला असता या ठिकाणी पोलिसांनी तपास करून या व्यक्तींची मुलींना बोलावून ओळख परेड केली असता त्यांची नावे रमेश चंद्रकांत पाटील (वय ४०) व संतोष जानकीराम कोलते (वय ४०) रा विल्हाळे ता. भुसावळ हे असल्याचे समजले.
या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरणगाव पोलिस स्टेशने सहाय्यक पोलिस निरिक्षक आशीष कुमार आडसूळ करीत आहे. या घटनेतील आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधिश यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.