मुंबई (वृत्तसंस्था) नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार आहे. आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं असून शाळा, मंदिरं टप्प्याटप्यात उघडणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नियम पाळणं खूप महत्वाचे असून सगळ्यांना कोरोनाकाळातील सर्व नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. नगरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच आता शाळा, मंदिरं, जिम टप्प्याटप्यात उघडणार असल्याची माहिती देखील यावेळी त्यांनी दिली.
















