चोपडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव पदाधिकारी व राज्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत समता शिक्षक परिषदेच्या चोपडा तालुका अध्यक्षपदी अर्जुन देवकीनंदन कोळी, कलाशिक्षक, अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय, कमळगाव ता. चोपडा यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य प्रदेश अध्यक्ष भरत शिरसाठ सर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष रणजित सोनवणे व जिल्हा उपाध्यक्ष गणेश बच्छाव व प्रज्ञा बाविस्कर यांचेही मार्गदर्शन लाभले यावेळी जिल्हा समन्वयक एच. बी. मोतिराळे सोबत तालुका समन्वयक आर. एस. नेवे (सी.बी निकुंभ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय घोडगाव) संजय बारी (तालुका सचिव), व सर्व पदाधिकारी,उपस्थित होते. या निवडीबद्दल सर्वत्र अर्जुन कोळी यांचे अभिनंदन होत आहे.