कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार गोकुळ भाऊलाल शिंपी यांची एरंडोल तालुका कृषी समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
आत्मा अंतर्गत एरंडोल तालुक्याची तालुका स्तरीय सल्लागार समिती ही नव्याने पुनर्गठित करण्यात आली असून सदरील तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीवर शिंपी यांची निवड करण्यात आली. आमदार चिमणराव आबा पाटील यांनी या नावाची शिफारस केली व पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या आशीर्वादाने निवड करण्यात आली. या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.