अमळनेर (प्रतिनिधी) वेब मिडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन व सचिव गणेश पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मुंबई येथे पार पडली. यावेळी मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर रामदास महाजन यांची निवड अमळनेर तालुकाध्यक्षपदी करण्यात आली.
जिल्हा, तालुका व वेबपोर्टलच्या संपादकांची 2023 ची कार्यकारणी घोषित केली. त्यावेळी मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर रामदास महाजन यांची निवड अमळनेर तालुकाध्यक्षपदी करण्यात आली. ईश्वर महाजन हे गेल्या वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी कार्यशाळा, उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन अनेक पत्रकारांचा त्यांनी गुणगौरव महाराष्ट्र पत्रकार संघटनेच्या माध्यमातून केला आहे. सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, कृषी क्षेत्रातील बातम्यांना ते नेहमीच प्रसिद्धी देत असतात. त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलासराव कोळेकर, राज्यसंपर्क प्रमुख बाबासाहेब राशिनकर, व पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर यांनी अभिनंदन केले. ईश्वर महाजन हे लवकरच अमळनेर तालुक्याची वेब पोर्टलची तालुका कार्यकारणी घोषित करणार आहेत. ज्यांना वेब पोर्टल अमळनेर तालुका कार्यकारणीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.