जळगाव (प्रतिनिधी) दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातील दोन विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एमपीएससी निकालात संदीप पाटील याची क्लर्कपदी तर ज्ञानेश्वर पाटील यांची आरबीआय सुरक्षा रक्षकपदी निवड झाली आहे.
या दोघांनी आपल्या यशाचे श्रेय दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे यश संपादन करु शकल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखे असे अनेक गरिब विद्यार्थी यशस्वी होतीलच अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या यशस्वतेबद्दल दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक प्रा. वासुदेव पाटील, प्रा. उमेश सुर्यवंशी, प्रा. रवींद्र टोंगळे, प्रा.हेमंत साळुंखे, प्रा. कपिलदेव कोळी, प्रा.मदन बनसोडे उपस्थित होते.