जळगाव (प्रतिनिधी) निःस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठान, फ़ूड बैंकच्या माध्यमातून शिरसोली प्र.ण गावातील गरीब, गरजु महिलांना भवानी माता मंदिर येथील पुजारी त्रिपाठी महाराज यांच्यावतीने नुकत्याच साड्या वाटप करण्यात आल्या.
यावेळी गरजु महिलांना साड्या वाटप करताना शिरसोली येथील पंकज वराडे, बेबा बाई अहिरे, सोनम पाटील तसेच प्रतिष्ठानचे नकुल सोनवणे व धीरज जावळे आदी उपस्थित होते.