‘आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा…’ ; ममता बॅनर्जीची भाजपावर खोचक टीका
कोलकाता (वृत्तसंस्था) आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मात्र भाजप सरकार या ठिकाणी लक्ष्य न देता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे प्राधान्य देत आहेत. यामुळे या ठिकाणी मोर्चा करत असल्याचं कार्यकर्ते म्हणाले. आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. भाजप आता सत्तेचा दुरुपयोग करून इतर पक्ष फोडताना दिसत आहेत. एक दिवस त्यांच्यावरही ही वेळ येईल, अशा शब्दांत ममता बॅनर्जीनी भाजपाला खडेबोल सुनावले आहे.
महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये ममता बॅनर्जी भाष्य केलं. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. आसाममधील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना पश्चिम बंगालला पाठवा, त्यांचा योग्य पाहुणचार करु असा टोला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला लगावला आहे.
बंडखोर आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या दिमतीला आमचे आसामचे मंत्री पोहोचत आहेत. आसाममधील सुमारे 20 लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. पण मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलाय. सत्तेचा गैरवापर करुन भाजपने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रातील उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
















