अकोला (वृत्तसंस्था) जन्मदात्या आईनेच आपल्या चिमुकल्या मुलीची नाकाला चिमटा लावून हत्या केल्याची घटना पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आईला अटक केली असून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्यानंतर तिचा मृत्यू बनाव आईने केला होता. पण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये या साडेपाच वर्षीय किशोरीच्या हत्येचा उलगडा झाला. या प्रकरणात आज खदान पोलिसांनी किशोरीची आई विजया हिला खुन प्रकरणात ताब्यात घेतले आहे. या विषयी किशोरीचे वडील रवी आमले यांनी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हत्येचा गुन्हा किशोरीच्या आईच्या विरोधात दाखल केला आहे. बलोदे लेआऊट मधील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नापासून पती पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील केली होती. आणि या वादात किशोरीचा बळी गेल्याचे चित्र आहे. नाकाला चिमटा लावून किशोरी झोपली आणि तिचा मृत्यू झाला असा बनाव किशोरीच्या आईने केला होता. तसा संशयच किशोरीच्या वडीलांना होता. त्यांनी पोलिसांना या संशयाबद्दल अवगत केले होते.
पोलिसांनी या प्रकरणात किशोरीचे पोस्टमार्टम केले आणि तपासात अनेक नव नवे खुलासे समोर आले. यात नाकाला चिमटा लावून किशोरीचा मृत्यू झाल्याचे केलेला बनाव समोर आला. तर पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तर तिच्या अंगावर आणि शरीरात मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे अधोरेखित झाल्याचे चित्र होते. या महिन्याच्या सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद किशोरीची घेतली गेली होती पण, पोस्टमार्टम रिपोर्टनंतर या प्रकरणात किशोरीची आई विजया आमले हिच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे, पीएसआय निता दामधर, पोलिस कर्मचारी करंदीकर, आकाश राठोड