मुक्ताईनगर (प्रतिनिधी) लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ जणांनी जंगलात नेत मारहाण करून लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा ऐवज जबरी लुटून नेला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी तात्काळ तपासचक्र फिरवीत सहा जणांना अटक केलीय.
पंकज रामसिंग राठोड (वय-२१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हा तरूण आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे जवळ बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी थांबला. याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७/८ अनोळखी जणांनी दोन्ही पती-पत्नीला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. यानंतर राठोड यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने व बाराशे रूपयांची रोकड असा एकूण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरी चोरून नेला. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सात संशयित आरोपींना मुक्ताईनगर पोलीसांनी अटक केली आहे.