फैजपूर (प्रतिनिधी) इलेक्ट्रिक केबल वायरची चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरांचा पाठलाग करणाऱ्या आरपीएफवर जवानवर एका चोराकडून चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Rpf Faizpur)
या संदर्भात अधिक असे की, दि. ४ जानेवारी रोजी रात्री ११ : ३० वाजेच्या सुमारास आरपीएफवर जवान अनुजकुमार रीसिपालसिंग हे नेहमी प्रमाणे दुसखेडा रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते. यावेळी त्यांना दोन अज्ञात चोरटे संगनमताने रेल्वे स्टेशन जवळ असलेले इले. रेल्वे केबल वायर चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसून आले. आरपीएफवर अनुजकुमार यांनी दोघांना हटकताच चोरट्यांनी पळ काढला.
अनुजकुमार यांनी दोघांचा रात्रीच्या अंधारात सिनेस्टाईल पाठलाग सुरु केला. यातील चोरटे त्यांना दुसखेडा रेल्वेस्टेशन बाहेरील कपाशीचे शेतात गेल्याचे दिसले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी एकाने अनुजकुमार यांच्या डावे दंडावर चाकु मारून जबर दुखापत केली. एका चोरट्याला पकडण्यात यश आल्यावर त्याची ओळख त्याने रवींद्र भाऊलाल सोनवणे (वय ३७, रा. उटखेडा, यावल) अशी सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून रवींद्र सोनावणेला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे हे करीत आहेत. दरम्यान, रात्रीच्या अंधारात चोरट्याचा सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या आरपीएफ जवानाच्या धाडसाचे कौतुक होत आहे.