जळगाव (प्रतिनिधी) शहरातील खोटे नगर भागातील धनश्री नगरात राहणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेचा ३० लाख रुपये मिळण्याच्या लालसापोटी २ जणांनी जीवेठार मारून त्यांच्या मृतदेहाची कुठेतरी विल्हेवाट लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आले असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहलता संजय चुंबळे (वय ६०, रा. धनश्री नगर खोटे नगर जळगाव), असे मयत झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहेत.
स्नेहलता चुंबळे या वृद्ध महिला आपल्या वास्तव्याला होत्या. दरम्यान त्यांच्याकडे ३० लाख रुपये आहे. अशी माहिती जिजाबराव अभिमन्यू पाटील आणि विजय रंगनाथ निकम दोन्ही रा. अमळनेर यांना मिळाली. त्यानुसार दोघांनी २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ३० लाख रुपये मिळण्याच्या लालसापोटी दोघांनी वृध्द महिलेचा घातपात करून जे ठार मारले आहे. आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावण्यात आले आहे. अशी तक्रार समीर संजय देशमुख (वय 28 रा. धनश्री नगर खोटे नगर, जळगाव) यांनी दिली आहे. त्यानुसार त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी २ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जिजाबराव पाटील आणि विजय निकम या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहे.