TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही : गुलाबराव पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2022
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या ३५ वर्षांपासून मी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईत येतोय. सकाळी रेल्वे पकडून मुंबईत दादरला उतरायचं. सुलभ शौचालयात अंघोळ करायची, त्यानंतर २ वडापाव खाऊन गेट वे ऑफ इंडियाला फिरायला जायचं आणि संध्याकाळी शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचे विचार ऐकायला, त्यांना पाहायला दसरा मेळाव्याला जायचं. गेल्या ३५ वर्षांत आमच्या गावी दसरा कसा होतो, हेही आम्हाला माहिती नाही, असे म्हणत शिवसैनिक म्हणून आपण दसरा मेळाव्याला दरवर्षी मुंबईत येतोय, असे म्हणत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेसाठी केलेल्या संघर्षाची कहाणीच सांगितली.

बीकेसीवरील दसरा मेळाव्यात बोलतांना ना. पाटील शिवसेनेतील संघर्षाची आठवण करुन दिली. ते पुढे म्हणाले की, आम्ही वारसदार नाही पण हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर आमच्या ४० जणांची नावं आहेत, असं ठणकावून सांगितले. तसेच, भविष्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभेवर भगवा फडकेल. शिवसैनिक झाल्यानंतर पहिलं चांगलं काम कोणतं झालं तर ते १५ दिवसांत पोलिसांनी तुरुंगात टाकलं. १५ दिवस मी तुरुगांत होतं. त्यानंतर, १९९२ दंगलीत आम्ही तिघे भाऊ आणि आमचा बाप असे चारजण एकाच बरॅकमध्ये तुरुंगात होतो. कन्हैय्या बंधुंना कोठडीतच मारलं गेलं, या दोन भावांचा खून केला गेला. या सर्वांच्या भरोशावरच ही शिवेसना वाढली आहे.

READ ALSO

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

आम्ही आमची आमदारकी आणि मंत्रीपदं सोडली, मला अगोदरही पाणीपुरवठा मंत्रीपदच होतं, आजही तेच आहे. मग का सोडलं होतं मी. कारण, बाळासाहेबांच्या विचारांपासून आम्ही दूर जातोय, असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही निर्णय घेतला, पद गेलं तरी चालेत पण तत्त्वाशी तडजोड करणार नाही. त्यामुळेच, आम्ही एकनाथ शिंदेंना साथ दिली, असे गुलाबराव यांनी बीकेसीतील सभेत बोलताना सांगितले. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून येथे लोकं आली आहेत. शिवाजी पार्कवरही सभा सुरू आहे, पण येथील सभेत स्वर्गीय बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांचा आत्मा आहे. तो आज एकनाथ शिंदेंना आशीर्वाद देतोय, कारण या महाराष्ट्रावर भगवा फडकून एक शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न आज तुम्ही पूर्ण केलंय, असेही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चटईचे दाणे, कुलर्स तयार करणाऱ्या कंपनीला आग

May 25, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले

May 25, 2026
गुन्हे

अनधिकृतपणे महिलेच्या घरात शिरत केला विनयभंग

May 24, 2026
गुन्हे

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

धरणगावातील पी.आर.हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचने घेतले आजचे चंद्राचे वाहन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबाद येथील सर्व धर्मीय, पक्षीय व धर्मगुरूच्या उपस्थित फारुक शेख यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव

December 28, 2021

हातात तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला एलसीबीकडून अटक !

December 20, 2020

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे : ना. गुलाबराव पाटील

June 24, 2021

आदिवासी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group