परभणी (वृत्तसंस्था) पहिली पत्नी असतांना दोन वर्षांपूर्वी दुसरीशी घरोबा केल्यानंतर छोट्या छोट्या वादातून निर्माण होणाऱ्या घरगुती भांडणाला कंटाळून आरोपी पतीने पहिल्या पत्नीच्या मदतीने दुसऱ्या पत्नीला संपवून तिचा मृतदेह कालव्यात फेकल्याची घटना परभणी शहरात उघडकीस आली होती. शिल्पा नामदेव दुधाटे (रा. नेहरुनगर, परभणी) असे खून करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून, नामदेव दुधाटे आणि स्वाती दुधाटे असे आरोपी पती-पत्नीचे नावं आहे.
शहरातील नांदखेडा रोड परिसरातील कालव्यामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह शहरातील नेहरूनगर परिसरातील शिल्पा नामदेव दुधाटे यांचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मागील दोन वर्षापूर्वी शिल्पाचे लग्न लिमला येथील डिंगाबर दुधाटे यांच्याशी झाला होता. तेव्हापासून हे शिल्पा आणि नामदेव दुधाटे सोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी नामदेव दुधाटेचा शोध शहरात घेण्याचा प्रयत्न केला असता नामदेव दुधाटे हा लिमला येथे गेल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून नामदेव दुधाटे यांच्या लिमला येथील घराचे परिसरात सापळा लावण्यात आला. यावेळी पोलीस पथकाने घरात जाऊन पाहणी केली असता तिथे एका महिलेसह नामदेव दुधाटे पोलिसांना आढळून आला. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे नामदेव दुधाटे, स्वाती दुधाटे असल्याचे सांगितले.
यावेळी मयत शिल्पा दुधाटे बद्दल चौकशी केली असता नामदेव दुधाटे याने माहीती दिली की, दोन वर्षापूर्वी शिल्पा सोबत लग्न केले होते. ते दोघे शहरातील नेहरूनगर येथे राहत होते. गुरूवारी (दि. १४) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांचे घरगुती कारणावरून भांडण झाले होते. त्यातून आरोपी नामदेव दुधाटे व त्यांची पहिली पत्नी स्वाती दुधाटे यांनी मिळून शिल्पाला मारहाण करून ती मेली असे समजून कालव्यात नेऊन फेकल्याचे सांगितले. त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी आरोपींना नानलपेठ पोलीस ठाण्यास स्वाधीन करण्यात आले. मृतदेह सापडल्यानंतर आकस्मित मृत्यू नोंद झाल्यानंतरच्या १२ तासाच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास लावला. या तपास पथकात वसंत चव्हाण, चितांबर कामठेवाड, अजित बिरादार, गोपीनाथ वाघमारे, बाळासाहेब तुपसुंदरे, रवी जाधव, आशा सावंत, जयश्री आव्हाड, दिलावर खान, निलेश परसोडे, शेख रफीयोद्दीन, सांगळे, गणेश पवार, विजय मुरकुटे, रंगनाथ देवकर, बालाजी रेड्डी, गणेश कौटकर यांच्या पथकाने केला.