जळगाव (प्रतिनिधी) दफनविधी करण्यात आलेला सात महिन्यांचा पुरुष जातीचा खराब गर्भ कबर खोदून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधितांकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील भिलपुरा परिसरात करीम शेख ताज मोहम्मद हे वास्तव्यास आहे. त्यांनी या संदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या गर्भवती पनीचा सात महिन्यांच्या गर्भाची व्यवस्थित वाढ न होण्यासह तो खराब असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने तो काढण्यात आला, त्यानंतर हा गर्भ करीम मोहम्मद यांनी अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये दि. ३० डिसेंबर रोजी दफन केला आणि त्या जागी मोठी दगड आणि फरशी ठेवली.
रविवारी दि. ३१ रोजी ते दफन केलेल्या ठिकाणी शांती प्रार्थना करण्यासाठी गेले असता तेथे ठेवलेले दगड आणि फरशी बाजूला फेकलेली तर कबर खोदलेली आढळून आले. तसेच कबरमधील मृतदेह गायब असल्याचे लक्षात आले, याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे.