धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या शासकीय आयटीआयजवळ काल रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलो वजनाचा गांजा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयितास अटक करुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव ते चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ ३ डिसेंबरला रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलोचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगव येथील हर्षल संतोष गारुंगे (वय २०) हा धरणगाव येथील शासकीय आयटीआयच्या गेटजवळ बॅग घेऊन उभा होता. पोलिसांनी बॅग तपासली असता प्लास्टिकमध्ये रेप केलेला हिरवट रंगाच्या लाल सुखापाला गांजा आढळून आला. एकूण साडेसात किलोचा गांजा जप्त करुन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. राहुल गायकवाड व त्यांचे सहकारी तसेच धरणगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. सुनील पवार, पो.उ.नि. संतोष पवार, पो.हे.कॉ. विष्णू बिऱ्हाडे, पो.कॉ. दीपक माळी, पो.कॉ. रवींद्र पाटील, सुधीर चौधरी, संदीप पाटील, किशोर भोई यांच्या पथकाने केली.
















