मुंबई (वृत्तसंस्था) गृहनिर्माण सोसायटीत अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला मुंबईत अटक करण्यात आली आहे.
११ वर्षीय पीडितेने शुक्रवारी आई-वडिलांकडे आपल्यावरील अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. कांजूरमार्ग येथील हनुमान गल्ली येथे राहणारा २९ वर्षीय आरोपी १५ ऑगस्टपासून मुलीचा छळ करत होता, असे पोलिसांनी सांगितले. कलम ३५४ (A) आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ४४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.