लातूर (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाबाबत विरोधी पक्षातील नेते सर्वपक्षीय बैठकीलाही उपस्थित राहिले नाहीत. दिल्लीत नाहीतर राज्य सरकारने याबाबत भूमिका घ्यावी, हा शरद पवार यांचा सल्ला चांगला आहे. पण ते पुढाकार घेत नाहीत. आरक्षणबाबत त्यांचीच भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाचा प्रश्न हा दिल्लीत नाहीतर राज्य सरकारनेच मार्गी लावणे गरजेचे असल्याचे . शरद पवार यांनी म्हटले होते. याला उत्तर देताना मंत्री महाजन म्हणाले, खासदार ‘शरद पवार हे वरिष्ठ नेते असले तरी आरक्षणाबाबत त्यांची भूमिका सर्व जनतेला माहिती आहे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. शिवाय ते अनेक वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले. त्यावेळीही त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. आता आम्ही आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. त्याला त्यांना यायचंही नाही आणि कुणाला येऊही द्यायचे नाही. पवार हे चांगले सल्ले देतात पण आरक्षणाबाबत त्यांनी पुढाकार घेतला तर ते राज्याच्या हिताचे होणार असल्याचे महाजन म्हणाले.