TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुन्नी मुस्लिम बांधवांतर्फे वसीम रिजवी याच्याविरोधात तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 10, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वसीम रिजवी व पुस्तक प्रकाशक या दोघांनी मोहम्मद या नावाने एक वादग्रस्त पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. यामुळे जगभरातल्या तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून वसीम रिजवी व पुस्तक प्रकाशक याच्याविरोधात शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक व शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

पवित्र इस्लाम धर्म हा सर्वसमावेशक असून जातीय वाद, भेदभाव, भाषावाद, प्रांतवादला इस्लाम धर्मात थारा नाही. असे असताना सुद्धा लखनऊ उत्तर प्रदेश येथील एक माथेफिरू समाजकंटक वसीम रिजवी हा नेहमी जाणून बुजून इस्लाम धर्मा बाबतीत चुकीच्या व खोट्या गोष्टी सांगून दूष प्रचार करत असतो. अशाच प्रकारे वसीम रिजवी याने अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर मोहम्मद या नावाने एक वादग्रस्त पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. त्यात पवित्र इस्लाम धर्म, अल्लाह, प्रेषित, कुरान व शरिअत (इस्लामी कायदे) यांच्याविषयी आकाश बुद्धीने अत्यंत चुकीची माहिती लिहून खालच्या स्तरावर जाऊन लिखाण केलेले असून पुस्तक प्रकाशनावेळी सुद्धा आक्षेपार्ह विधान केले. यामुळे जगभरातल्या तमाम मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊन सर्व मुस्लिम समाज व्यथीत झाला आहे.

READ ALSO

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

तसेच या पुस्तकामुळे इस्लाम धर्माबाबत सर्वत्र गैरसमज निर्माण होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. म्हणून मोहम्मद या पुस्तकाचा लेखक वसीम रिजवी व त्या पुस्तकाच्या प्रकाशक या दोन्ही आरोपींन विरुद्ध भा. दं. वि. कलम 153 (अ), 153 (ब), 295 (अ), 298, 505 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच या दोघा आरोपींना भविष्यात असे कृत्य करण्यापासून अटकाव करण्यासाठी तसेच या वादग्रस्त पुस्तकावर लवकरात लवकर बंदी घालण्यात यावी, म्हणून आज जळगाव शहरातील सुन्नी मुस्लिम बांधवांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक व शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना लेखी तक्रार दिली. तसेच शनिपेठ पोलीस स्थानकात दोघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याप्रसंगी तक्रारदार तसेच सून्नी ईदगाह ट्रस्ट जळगाव व सून्नी जामा मस्जिद जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, रफिक कुरेशी, सय्यद जावेद, अहेमद खान, सय्यद उमर, नाझीम कुरेशी, विकार शेख इत्यादी उपस्थित होते. तसेच सदर दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास तसेच या वादग्रस्त पुस्तकावर बंदी न घातली गेल्यास संपूर्ण भारतातील मुस्लीम समाज रस्त्यावर येऊन आंदोलन करेल, यास सर्वस्वी दोन्ही आरोपी व सरकार व प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सुन्नी मुस्लिम बांधवांनी दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

जागतिक उर्दू दिनानिमित्त मनियार बिरादरीचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात काँग्रेस नसती तर काय झालं असतं ; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात

February 8, 2022

भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

September 28, 2020

रासायनिक खतांची दर वाढ त्वरित मागे घ्या : खा. रक्षाताई खडसे

May 18, 2021

भदंत अश्वजित यांचे धार्मिक कार्य प्रेरणादायी – जयसिंग वाघ

September 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group