धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांचा ८० वा वाढदिवसानिमित्ताने प्रदेश कार्यकारणीने हा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करून तो संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाइन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
आपल्या आवडत्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते ठिकाणी एकत्र जमुन त्यांचा वाढदिवस साजरा करत होते. धरणगाव येथे विश्वकर्मा वीज कामगारांची पतसंस्थेचा सभागृहात सकाळी ११ वाजे पासून एलईडी प्रोजेक्टर लावून सर्व कार्यकर्त्यांचा समोर ऑनलाईन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. शरद चंद्र पवार भाषणाला उठल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जोश निर्माण झाला व ‘शरद चंद्र पवार आगे बढो’ च्या घोषणा सर्वांच्या मुखात दुमदुमू लागल्या. या प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश माणिक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती एन. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ग्रंथालय सेल माजी जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस अरविंद देवरे, तालुकाध्यक्ष धनराज माळी, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल पाटील, तालुका युवक अध्यक्ष नाटेश्वर पाटील, शहराध्यक्ष निलेश चौधरी, युवक अध्यक्ष संभाजी कंखरे, नारायण चौधरी, सी.के. पाटील, विकास लांबळे, रामचंद्र माळी, आर. डी. पाटील, मेघराज पाटील, दिनेश भदाणे, मार्केट कमिटी संचालक रंगराव सावंत, चावलखेडा सरपंच राजू वाणी, देवेंद्र देसले, भुषण पाटील, आनंद पाटील, हरीश, राजू शेख, राजू ओस्तवाल, सुनील मराठे व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.