जळगाव (प्रतिनिधी) आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराच्या सन्माननीय विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. प्रिंट मीडिया श्रेणीत संजय प्रभाकर देशमुख (जालना), इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीत जगदीश एकनाथ जयस्वाल (शहादा), ऑनलाईन न्यूज पोर्टल श्रेणीत शेखर पाटील (जळगाव) व सोशल मीडिया मुक्त लेखन म्हणून निलेश सुभाष वाणी (भुसावळ) यांना गौरविण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा देवगिरी विश्व संवाद केंद्रातर्फे ऑनलाईन व्यासपीठावर आयोजित करण्यात आलेला आहे. दि. ६ जून, २०२१ रविवार रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू होईल. या ऑनलाइन सोहळ्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. विनयजी सहस्रबुद्धे (अध्यक्ष, इंडियन कॉउन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स तथा राज्यसभा सदस्य) तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून डॉ. केजल भारसाखळे (उपाध्यक्षा, देवगिरी विश्व संवाद केंद्र) उपस्थित असतील. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण देवगिरी विश्व संवाद केंद्राच्या यु-ट्यूब चॅनलवर करण्यात येणार आहे.