मुंबई (वृत्तसंस्था) अश्लिल फिल्म प्रकरणात उद्योगपती राज कुंद्राच्या बँक खाते आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी क्राइम ब्रांचच्या फॉरेन्सिक परीक्षकाला नियुक्त केलं आहे. क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, अरविंद श्रीवास्तव, हर्षिता श्रीवास्तव आणि कंपनीशी संबंधीत अन्य काही व्यक्तींच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे. पोलिसांनी या प्रकरणात राज कुंद्राची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट दिलेली नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंद्रा यांचे बँक खाते आणि विवान इंडस्ट्रीजचे संयुक्त खाते, ज्यात शिल्पा शेट्टी दिग्दर्शक होत्या, याचीही चौकशी सुरु आहे. ही कंपनी कथित पॉर्न फिल्म प्रकरणाच्या मध्यभागी आहे. ते म्हणाले की, कुंद्राकडे अशी अनेक बँक खाती आहेत ज्यात परदेशातून पैसे जमा होते. या अधिकाऱ्यानं सांगितले की, शेट्टी यांनी संचालित केलेल्या कोणत्याही बँक खात्यातील व्यवहारांची माहिती आतापर्यंत तपासकार्यांच्या निदर्शनास आलेली नाही, सोबतच ‘हा तपासाचा भाग असल्यानं खात्यांची तपासणी केली जात आहे, त्यामुळे शिल्पा शेट्टी यांना अद्याप क्लीन चिट देण्यात आलेली नाही. मात्र, आम्ही कोणाच्याही वैयक्तिक खात्यांशी संबंधित नाही.’ १९ जुलै रोजी मुंबई गुन्हे शाखेनं अश्लील चित्रपट बनवून अॅपच्या माध्यमातून शेअर केल्याच्या आरोपाखाली कुंद्राला अटक केली होती.
या कारणांमुळे शिल्पावर संशय
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचं PNB बँकेतील खातं संशयाच्या घेऱ्यात आहे. राज कुंद्रा या अकाऊंटमध्ये पॉर्नोग्राफी व्यवसायातील पैसे जमा करत असे. हे अकाऊंट शिल्पा-राज यांचं जॉईंट अकाऊंट असल्यामुळे शिल्पादेखील या पैशाचा वापर करत असे. तसेच या व्यवसायातील कमाईवरून शिल्पा शेट्टीने गुंतवणूक करणे तसेच क्रिप्टो करन्सीमध्ये इन्वेस्ट करणे या गोष्टी देखील केल्या आहेत. त्यामुले संशयाची सुई शिल्पा शेट्टीच्या अवती भवती देखील फिरत आहे.
तसेच शिल्पा यावर म्हणते की, तिला राज कुंद्राच्या या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हती. या प्रकरणात या दोघानांही फसवलं जात आहे. शिल्पाने राजच्या बहिणीचा नवरा प्रदीप बख्शीला या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हटलं आहे.
















