धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामीण रुग्णालयातील कॉन्ट्रॅक्टपद्धतीने काम करणारे सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका चालक यांचे तब्बल १० ते १२ महिन्याचे पगार थकीत होते. ही बाब शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा लक्षात येताच त्यांनी ठेकेदाराला फोन करून चांगलेच धारेवर धरले. कॉन्ट्रॅक्टरने तात्काळ सर्व कर्मचाऱ्यांचे पगार त्यांच्या खात्यात टाकले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील कॉन्ट्रॅक्टपद्धतीने काम करणारे सफाई कर्मचारी व रुग्णवाहिका चालक यांचे तब्बल १० ते १२ महिन्याचे पगार थकीत होते. कोरोनाच्या महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असतांना त्यांचे पगार थकले असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांना मिळाली. त्यांनी लागलीच ठेकेदाराला फोन लावून सर्व कर्मचाऱ्यांचे पगार टाकण्याचे सांगत. चांगलेच खडेबोल सुनावले. घाबरलेल्या ठेकेदाराने क्षणाचा ही विलंब न करता पुढच्या १० मिनिटात सर्व कर्मचाऱ्यांचे ५ महिन्याचे पगार टाकले. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांचे आभार मानले.