TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिवसेना हीच आपली भावकी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील !

कार्यकर्त्यांनो, तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला गुलाबरावांसारखे नेतृत्व लाभले : जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांचे गौराद्गार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2023
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जनतेचे पाठबळ हीच खरी उर्जा असून या माध्यमातून अजून जनसेवा करण्याचे बळ मिळत असते त्यासाठी संपर्क हीच राजकारणातील सर्वात मोठी ताकद आहे. धरणगाव व जळगाव तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करून नवीन कार्यकर्त्यांचा मान राखून एकजुटीने पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील रहा.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हीच आपली खरी ताकद असून शिवसेना हीच आपली भावकी असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले आहे. तर जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य टिकविण्यासाठी प्रयत्नशील राहून ना. गुलाबराव पाटील यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासून सज्ज राहावे. जिल्हावासीयांना गुलाबराव पाटलांसारखे खंबीर नेतृत्व लाभल्याने कार्यकर्त्यांनो तुम्ही भाग्यवान आहात, अश्या शब्दात जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी गौराद्गार काढले. जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदार संघाच्या बैठकीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे हे होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख मनोज हिरवे हे समता जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या निमित्ताने त्यांचा सत्कार शिवसेना नेते तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे हस्ते करण्यात आला.

READ ALSO

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

बैठकीप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्ता हा माझ्या हृदयात असून आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुका येत असून यात आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. ६ नोहेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सत्ता स्थापन करण्याकरिता शिवसैनिक व युवासैनिकांनी सज्ज राहावे. पक्ष संघटनेला महत्त्व देऊन सर्वांनी एकदिलाने काम करावे. महिलांचा प्रभाव या ग्रामपंचायतीवर दिसणार असल्याने कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या महिलांना निवडणुकीत उभे करावे. सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घ्यावी अश्या सूचनाही ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या.

पक्षाची ध्येय – धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवा : जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे !

कार्यकर्त्यांची एकजूट महत्वाची आहे तसेच तालुक्यातील गाव – गाव आणि घर – घर शिवसैनिक नोंदणी करून शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून पक्ष मजबूत करण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे यांनी केले.

यांची होती प्रमुख उपस्थिती !

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील सर यांनी तालुक्यातील जळगाव व धरणगाव तालुक्यातील ३२ ग्रापं तीचे निवडणूक बाबत तसेच शिवसेना बांधणी बाबत सविस्तर माहिती विषद केली. सूत्रसंचालन तालुकाप्रमुख शिवराज पाटील यांनी केले तर तर आभार धरणगाव तालुका प्रमुख डी.ओ. पाटील यांनी मानले. व्यासपीठावर महानगर प्रमुख गणेश सोनवणे, कुंदन काळे, शहर संघटक दिलीप पोकळे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोळे, नरेंद्र सोनवणे, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख तथा पं. स. सभापती मुकुंद नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, श्याम कोगटा जळगाव व धरणगाव तालुका प्रमुख शिवराज पाटील, डी.ओ. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पावन सोनवणे, शहर प्रमुख राजेंद्र महाजन ,विकास धनगर विकास पाटील, दुध संघाचे रमेश पाटील गटनेते पप्पू भावे , पी.के. पाटील, युवासेनेचे तालुका प्रमुख अजय महाजन, रामकृष्णा काटोले, विश्वनाथ माळी, दीपक भदाणे, स्वप्नील परदेशी, राजेंद्र चव्हाण, भानुदास विसावे, माजी सभापती. नंदलाल पाटील, जणाआप्पा कोळी, डॉ. कमलाकर पाटील, तुषार महाजन, वासुदेव चौधरी, साहेबराव वराडे, सुरेश गोलांडे, गजानन जगदाळे, वैद्यकीय सेनेचे जितु गवळी, अर्जुन पाटील महिला आघाडीच्या महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योतीताई शिवदे, प्रिया इंगळे, गिरीश सपकाळे, आशुतोष पाटील, चेतन संकत अजय देशमुख, हर्शल मावळे, शंतनू नारखेडे, हितेश ठाकरे, देविदास कोळी, संजय घुगे, गोविंदा पवार, शीतल चिंचोरे, रेखा पाटील, सुनीता पाटील, पुष्पा पाटील, मोतीआप्पा पाटील, जितु पाटील, यांच्यासह जळगाव शहर व जळगाव ग्रामीण मतदार संघातैल शिवसेना , युवसेना व महिला आघाडीच्या पदधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरात घुसून तरूणीला मारण्याची धमकी देत वृध्देला मारहाण !

June 17, 2025
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 जून 2025

June 13, 2025
जळगाव

मनपाच्या प्रभाग रचनेसह सदस्य संख्येत नाही कोणताही बदल ; महापालिकेत झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या पत्राचे वाचन

June 12, 2025
गुन्हे

उपचारासाठी नेते सांगत महिलेचे दागिने नेले चोरुन !

June 12, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
जळगाव

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025
Next Post

'युगपुरुष स्वामी विवेकानंद' वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सांत्वनपर भेट देऊन परतणाऱ्या दाम्पत्याला भरधाव डंपरनं चिरडलं ; पती-पत्नीचा जागीच मृत्यू !

April 17, 2023

धरणगाव येथील तहसीलदार स्वतः करताय ईपीक पाहणी अँपची जनजागृती

August 20, 2021

महाराष्ट्र घाबरला नाही.. घाबरणार नाही; वर्षपूर्ती सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

December 3, 2020

जामनेर तालुका हादरला : पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

August 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group