जळगाव (प्रतिनिधी) शिवसेना जळगाव महानगरतर्फे ज्येष्ठ नागरिकांच्या साहय्यासाठी ऑनलाईन कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन रविवारी जिल्हा शल्यचिकित्सक एन. एस. चव्हाण, मनपा विरोधी पक्ष नेता सुनील महाजन, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया, शिवसेना नगरसेवक नितीन बर्डे, शहर संघटक दिनेश जगताप, विभागप्रमुख प्रशांत सुरळकर, अमित जगताप, प्रीतम शिंदे, अर्जुन भारुळे, पियुष हसवाल, हितेश सूर्यवंशी, राहुल चव्हाण, प्रशांत वाणी, संदीप सूर्यवंशी, वैभव पाटील, शिवम महाजन, गोपाळ पाटील, सुनील मराठे, गजेंद्र चौधरी, चंद्रकांत मराठे उपस्थित होते. सदर केंद्र दिनांक ७ मार्च ते १५ मार्च २०२१ दरम्यान, सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संत कंवरराम चौक (पांडे चौक) जळगाव येथे सुरु राहणार आहे.
केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांची कोविड लस साठी ऑनलाईन नोंदणी करून देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावे असे आव्हान शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.