धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळे, बाभळे, निशाने या परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी तग धरत नाहीय. त्यामुळे गिरणा कॅनल वरील ब्रांचदोनला लवकरात लवकर पाणी सोडावे, यासाठी मागणीसाठी शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली.
पंधरा दिवसापासून रब्बी हंगामासाठी तालुक्यात पाटबंधारे विभाग अतर्गत पाणी सुरू झाले आहे. तर ब्रांच दोन वरील शेतकऱ्यांनी रब्बी पेरण्या अर्थात गहू ,मका ,हरबरा याची पेरणी वीस पंचवीस दिवसापूर्वी केली आहे. परंतू गिरणा कॅनल वरील ब्रांच 2 म्हणजे धरणगाव पिंपळे, बाभळे, निशाने या परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाणी अभावी उगवन झालेली नाही. त्यासाठी ब्रँच दोनला लवकरात लवकर पाणी सोडावे यासाठी उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग धरणगावचे जाधव साहेब यांची या सर्व शेतकऱ्यांनी भेट घेऊन व्यथा मांडल्या. त्यानंतर जाधव साहेबांनी संबंधित गावाच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आज पासून पाणी पोहोचेल एवढं पाणी आज सोडतो, असे आश्वस्त केले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली खालील शेतकरी उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अॅड. शरद माळी, शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक भागवत चौधरी, युवा सेनेचे लक्षण माळी, तसेच पिंपळे गावातील शेतकरी जगदीश पाटील, माजी सरपंच संदीप निंबा पाटील, श्रीकृष्ण संजय पाटील ,विनायक शालिग्राम पाटील, गुड्डू हिम्मत पाटील ,भगवान भिकारी पाटील, संतोष जिजाबराव पाटील, प्रशांत शांताराम पाटील ,मुकेश गुलाब पाटील ,आनंदा नवल पाटील, रवींद्र पाटील, गणेश चुडामन पाटील,या सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व साहेबांचे आभार देखील मानले.