धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील दादाजी नगरातील दादाजी धाम येथे श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिर संस्थेच्या वतीने प्रथमच भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. आज रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कथेची सांगता झाली. मानव जीवनाच्या उद्धारासाठी शिव महापुराण कथा अत्यंत गरजेची असल्याचे प्रतिपादन शिव पुराण कथा व्यास प्रवक्ते हभप कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज, जळगांवकर यांनी आपले मत व्यक्त केले.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील दादाजी नगरातील नर्मदेश्वर महादेव संस्था मंडळाच्या वतीने प्रथमच शिवभक्ती भव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेची सुरुवात दादाजी धाम येथे रविवार दि. १० डिसेंबर रोजी झाली होती कथा प्रवक्ते हभप कृष्णकृपा प्रेममूर्ती दिलीपजी महाराज जळगावकर, यांच्या सुमधुर वाणीतून शिवपुराण कथेतील भगवान महादेवाच्या अनेक लीलांचे वर्णन सात दिवस भाविकांनी पाहिले आणि ऐकले. कथेदरम्यान सकाळी पूजा, आरती, अभिषेक करण्यात येत होता. आपल्या सहजीवनामध्ये सुख, समाधान, शांती मिळवण्यासाठी भगवान महादेवाची कशाप्रकारे सेवा करावी. शिवपुराण कथेच्या माध्यमातून वर्णन केले. मानवी जीवनाच्या उद्धारासाठी शिव महापुराण कथा अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन कथा प्रवक्ते हभप जळगांवकर महाराज यांनी आपले मत व्यक्त केले.
कथा सुरुवातीला आणि शेवटी मंडळाच्या वतीने भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात येत होती. कथा सांगताप्रसंगी उपस्थित भाविकांना अकरा हजार रुद्राक्षांची वाटप करण्यात आली व तदनंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, गटनेते विनय भावे, उद्योजक भगवान महाजन, वाल्मीक पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, विलास महाजन, संजय चौधरी, मधुकर शिरसाठ, आर डी महाजन, निलेश पवार, गोपाल पाटील, राहुल माळी, भूषण पाटील यांच्यासह शहरातील व पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष व बालगोपाळांची उपस्थिती होती. सदरील कथा यशस्वीतेसाठी दादाजी नगरातील व विश्वस्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.