धरणगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील पी. आर. हायस्कूलच्या पटांगणावर भव्य असा शिवमहोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर्किटेक कोचींग क्लासेसच्या शिक्षिका नेहा गुप्ता यांनी केले.
दिनांक १९ फेब्रुवारी वार रविवार रोजी शिवमहोत्सव घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ अरुणजी कृष्णजी कुलकर्णी – (प.रा हायस्कूल. अध्यक्ष ), समाधान पाटील (संचालक स्वामी विवेकानंद इ. मि. स्कूल व कोचिंग क्लासेस), पत्रकार बी. आर. महाजन, सुनिल चौधरी (अध्यक्ष: कर्तव्य बहुउद्देशीय संस्था), वैशाली पवार (मुख्याध्यापिका गुरुकुल इं. मि.), भारती चौधरी (शिवसेना महिला शहर प्रमुख), अँड. स्वामी राजेंद्र निकम, प्रमुख प्रवक्ते सतिश शिंदे (सर) आणि पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्याक डॉ. संजीवकुमार सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार बी. आर्किटेक कोचींग क्लासेसचे शिक्षक जितेंद्र चखाले सर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजया प्रकाश सोनवणे यांच्यासह जयश्री महाजन,आणि कोमल मराठे यांनी केले.
















