कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) येथील रहिवासी शोएब शेख भिवंडी येथील प्राथमिक उर्दू शाळा येथे शिक्षक आहेत. त्यांना भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी कोकण विभागतर्फे दिला जाणारा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी नूरुद्दीन मुल्लाजी, मुश्ताक शेख, अजीज शेख, अकबर अली सय्यद, मोईन शेख (मालेगाव), महेमील शेख, अल्फुद्दींन मुल्लाजी यांनी शोएब शेख यांचे अभिनंदन केले आहे
















