मुझ्झफरपूर (वृत्तसंस्था) प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना बिहार राज्यातील मुझ्झफरपूर मध्ये घडली. रामपूरशाह येथील १७ सौरभ कुमार हा प्रेयसीला भेटण्यासाठी गेला होता. तेव्हा प्रेयसीच्या कटुंबीयानी या दोघांना पहिले आणि त्यानंतर त्याची हत्या केली. धक्कादायक म्हणजे सौरभला प्रेयसीच्या कुटुंबाने मारहाण तर केलीच पण त्याचा गुप्तांगही कापले.
मुझ्झफरपूर जिल्ह्यातील रेपुरा रामपूरशाह येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर सौरभच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुशांत पांडेय ऊर्फ विजय कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. यासह अन्य् तिघांना अटक करण्यात आली आहे.
सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या जमावाने आरोपींच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तणावजन्य स्थिती पाहून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले आहे.