नाशिक (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असतानाच नाशिकमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे एकूण ३० रुग्ण आढळून आले आहेत. नाशिकमध्ये ३० जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला असून यापैकी २८ रूग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
कोरोना निर्बंधातून काहीसा दिलासा मिळाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टाचा व्हेरिएंट आढळल्याने आरेाग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरेाना पॉझिटिव्ह संशयित १५५ रुग्णांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले हेाते. शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला त्याचा अहवाला प्राप्त झाला असता ३० रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आला. यामध्ये दोन रुग्ण नाशिक शहरातील तर अन्य रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.
तर, हे ३० रूग्ण डेल्टा पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे जिनोम सीक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा रूग्णालयामधील सर्जन डॉ. किशोर श्रीनिवास यांनी दिली आहे.
१३५ देशांत डेल्टाचा कहर
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार जगातील १३५ देशांमध्ये झाला आहे. हा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात आढळला होता. पुढच्या आठवड्यात जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या २० कोटी पार करेल, असं जागतिक आरोग्य संघटनेनं ३ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या साप्ताहिक कोरोना अपडेटमध्ये म्हटलंय.