पटणागड (वृत्तसंस्था) ओडिशा येथील बालगिरी जिल्ह्यातील एकाच घरात ६ मृतदेह आढळून आले असून या घटनेत ४ मुलांचा समावेश आहे. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, मृत्युचे कारण अद्यापही समजू शकले नसून शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (वय- ५०), त्यांची पत्नी ज्योती (वय- ४८) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते १२ वर्षे असल्याचे सांगितले आहे. पटणागड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रियंका राऊत्र यांच्या म्हणण्यानुसार हा खून की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेला नाही आहे. ते म्हणाले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराचा शोध घेतला जात आहे जेणेकरून घटनेची कारणं शोधला येतील.