मुंबई (वृत्तसंस्था) केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात १७ वर्षीय मुलीला तिच्या प्रियकराने गर्भधारणा केल्याचा आरोप करत तिने स्वतः घरीच युट्यूब व्हिडिओंच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने २० ऑक्टोबर रोजी बाळाला जन्म दिला आणि युट्यूबवरील व्हिडीओचे मार्गदर्शन घेत स्वतःची नाळ कापली. याप्रकरणी आरोपी प्रियकराविरूद्ध पॉक्सो ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी अल्पवयीन मुलीने घरीच यूट्यूबवर व्हिडीओपाहून बाळाला जन्म दिला आणि गर्भनाळ काढून टाकली. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या पालकांना २२ ऑक्टोबर म्हणजे २ दिवसांनी याबाबतची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलीचे पालक हे अंध आहेत. त्यामुळे दोन दिवसांनी जेव्हा नवजात बालकाचा आवाज कानी पडला तेव्हा त्यांना याबाबतची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलगी ही १२ वीमध्ये शिकत असून तिचे पालक दृष्टीहीन आहेत. त्यामुळे त्यांना आपली मुलगी गरोदर असल्याची कल्पना देखील नव्हती. अल्पवयीन मुलगी आणि २१ वर्षीय तरूणाचे प्रेम संबंध होते. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यावर तिचा विवाह करून देण्याचा पालकांचा मानस होता.
या दोघांनी मात्र प्रेग्नन्सी गुप्त ठेवली होती. पोलिसांनी पुढे सांगितले की, मुलीने ऑनलाइन क्लासेस असल्याचे सांगून नेहमी तिच्या खोलीत राहून तिची गर्भधारणा लपवून ठेवली होती. सीडब्ल्यूसीने आईला तिच्या मुलीच्या गर्भधारणेबद्दल काही महिने पूर्णपणे अनभिज्ञ असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ती म्हणाली की आई दृष्टिहीन आहे आणि वडिल सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात आणि ते नेहमी रात्रीच्या ड्युटीवर असतात. आईने गृहीत धरले होते की मुलगी ऑनलाइन क्लासेस करते तेव्हा ती स्वतःला खोलीत कोंडून घेते. आणि आरोपीने मुलीच्या घरी या परिस्थितीचा गैरफायदा घेतला, असे पोलिसांनी सांगितले.