वरणगाव (प्रतिनिधी) पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने भरस्त्यात पत्नीला शिवीगाळ करून नायलॉनच्या दोऱ्याने हात-पाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात मनीषा गणेश राजौलकर (वय ३१ रा. गणपती नगर वरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. २२ मे २०२२ रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास मनिषा ही तिची मैत्रीण आशा हीच्यासोबत बोलत होती. यावेळी गणेश रामेश्वर राजौलकर, सरस्वती रामेश्वर राजौलकर, नणंद कविता देवा पारेकर, नणंद माया मुकेश आडनाव माहीत नाही, दिलीप कोळी पूर्ण नाव माहीत नाही, संगीता दिलीप कोळी (सर्व रा. गणपती नगर वरणगाव), भरत (पूर्ण नाव माहीत नाही), मनीषा भरत (आडनाव माहीत नाही, दोन्ही रा. रामपेठ वरणगाव ता. भुसावळ) यांनी तुझे बाहेर अनैतिक संबंध आहे. असा संशय घेवून गैर कायद्याची मंडळी जमवून मनीषा हिस शिवीगाळ करून नायलॉनच्या दोरीने हात-पाय बांधून एक तास मारहाण केली. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्थानकात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका मुकेश जाधव हे करीत आहेत.