पुणे (वृत्तसंस्था) ऑटिसिझम (आत्ममग्न)ची शिकार असलेल्या १४ वर्षाच्या मतीमंद मुलीने ३३ वर्षीय मतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कोथरुडमधील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान या संस्थेत घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीमधील एका मतिमंद मुलींच्या संस्थेमध्ये १४ वर्षीय मतीमंद मुलीने ३३ वर्षीय मतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून, तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कोथरुड परिसरात गतीमंद मुलांची एक विशेष शाळा आहे. त्या ठिकाणी मुलं खेळत असताना हा सर्व प्रकार घडला आहे. इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावरून मुलीली खाली ढकलून देण्यात आलं. इमारतीवरून ही मुलगी खाली पडताच घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.