नाशिक (वृत्तसंस्था) एका भोंदूबाबाने भावाच्या मदतीने आईसह ३ मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येवल्यात घडली आहे. शिवाय या प्रकरणात धमकी देऊन पैसे उकळण्यात आले. या बलात्काराच्या घटनेने नाशिक जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दरम्यान, येवला पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
चाकूचा धाक दाखवत बलात्कार
सुफी अजीज अब्दुल बाबा आणि जब्बार शेख अशी या दोन्ही आरोपींची नावं आहेत. पीडित महिला येवल्याच्या नागडे गावात रहायच्या. आपल्या मुलींचं लग्न जमत नसल्यामुळे महिला त्यांना एका बाबाकडे घेऊन गेली. यावेळी बाबाने तिला तुझ्या मुलीवर जादूटोणा झाला आहे असं सांगितलं. यानंतर भोंदूबाबाने परिस्थितीचा फायदा घेऊन चाकूचा धाक दाखवत बलात्कार केला. इतकेच नाही तर बलात्कार करतानाचा व्हिडीओ शूट केला.
ब्लॅकमेल करुन पीडित मुलीच्या आईवर बलात्कार
या व्हिडीओच्या सहाय्याने भोंदूबाबाने तिच्या आईला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मग या भोंदूबाबाने पीडित मुलीच्या आईसह इतर दोन मुलींवर बलात्कार केला. या बाबाने आईसह तिन्ही मुलींवर सलग दोन वर्ष ४ महिन्यांच्या काळात शारिरिक अत्याचार केले. याचसोबत या भोंदूबाबाने धमकी देऊन पैसेही उकळल्याचं समोर आलंय. आरोपी भोंदूबाबाने यापैकी एका मुलीला हिंदू धर्माबद्दल मनात द्वेष निर्माण करुन मुस्लीम धर्मात प्रवेश करण्यासाठी प्रवृत्त केले. येवला पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करुन प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आहे.