जयपूर (वृत्तसंस्था) पत्नीसोबत लहान भावाचे संबंध असल्याच्या संशयावरून एका मोठ्या भावाने लहान भावाची हत्या (Killed younger brother) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला कळालं की त्याच्या पत्नीसोबत लहान भावाचे संबंध आहे, त्यानंतर मोठ्या भावाने मित्रासह मिळून त्याची हत्या केली.
जंगलातच क्रूरपणे भावाची हत्या
ही संपूर्ण घटना राजस्थानमधील भरतपूर येथील आहे. येथे पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाच्या संशयाखाली तरुणाने आपल्या छोट्या भावाची हत्या केली. हत्या करण्यासाठी त्याने आपल्या मित्राकडून भावाला फोन केला आणि त्याला जंगलात एकटं येण्यास सांगितलं होतं. आणि जंगलातच अत्यंत क्रूरपणे स्वत:च्याच लहान भावाची हत्या केली.
वहिनीसोबत होते अवैध संबंध
आरोपी वसीम आणि त्याचा मृत भाऊ नसीमसह अन्य एक भाऊ आहे. या तिघांचं लग्न अलवर जिल्ह्यातील तिजारा तहसील गावातील मुसेपूर येथील तीन बहिणींसोबत झालं होतं. मात्र मृत नसीम याचे आपल्या मोठ्या वहिनीसोबत अवैध संबंध होते. ज्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. तिघे भाऊ ट्रक चालवून घराचा सांभाळ करतात. हा प्रकार समोर आल्यानंतर आरोपीसह त्याच्या मित्रालाही अटक करण्यात आली आहे.