जळगाव (प्रतिनिधी) माजी मंत्री आ. गिरीश महाजन व बीएचआर प्रकरणी फरार असलेल्या सुनील झंवर आणि महाजन यांचे समर्थक रामेश्वर नाईक यांच्यावर नूतन मराठा संचालकांच्या दोन गटांमधील वादात धमकावल्या प्रकरणी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत अॅड. विजय भास्कर पाटील यांनी तक्रार केली आहे.
याबाबत वृत्त असे की जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांमधील वाद सर्व ऋतू आहेत. गटांमध्ये आजवर अनेकदा संघर्ष झालेला आहे. या पार्श्वभूमीवर, नजर मध्यंतरी भोईटे गटाला तात्कालीन मंत्री गिरीश महाजन यांचा पाठिंबा असल्याची चर्चा दबक्या आवाजात होत होती. याच अनुषंगाने दिवंगत नरेंद्र पाटील यांचे बंधू ॲड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव ही संस्था सहकार कायद्यानुसार चालते. सदर संस्थेचे एकूण २८ माध्यमिक शाळा, १० किमान कौशल्य महाविद्यालय, १० जुनियर कॉलेज, १ डीएड कॉलेज, १ प्रायमरी स्कूल, ३ सीनियर कॉलेज असून या संस्थेची सर्व मालमत्ता जवळपास एक हजार कोटी रुपये आहे. जळगाव, वरणगाव, यावल या तीन सीनियर कॉलेज व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी सन २०११ चे संचालक मंडळाच्या गैरकारभार व गैरवर्तणूक बाबत सविस्तर अहवाल उच्च शिक्षण विभागाच्या संचालककडे सादर केला होता. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने दि. १६/०६/२०१२ रोजी जळगाव, वरणगाव , यावल यातील सीनियर कॉलेज वर प्रशासक नेमले. संस्थेचे संचालक हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी दि. २३/१२/२०११ रोजी बरखास्त केले. सदरचे आदेश दि. २५/०५/१२ रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी कायम केले. सदरच्या आदेशास मा. सहकार मंत्र्याकडे आव्हान दिले. परंतु, १७/०७/२०१२ रोजी सहकार मंत्र्यांनी वरील दोन्ही आदेश कायम कर्ण संस्थेचा रिविजन अर्ज फेटाळला. जिल्हा उपनिबंधक काढणे नियुक्त केलेल्या तीन शासकीय प्रशासक मंडळाने पोलिसांसमक्ष संस्थेचा ताबा दिनांक १८/७/२०१२ रोजी घेतला. व तसा पंचनामा केला. सदर मंडळात तालुका उपनिबंधक जिल्हा, जळगावचे नीळकंठ ज्ञानदेव करे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पाचोराचे के.पी. पाटील तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, भडगावचे जी. एच. पाटील यांचा समावेश होता. सदर प्रशासकीय मंडळाने आपले कामकाज दि. १८/०७/२०१२ रोजी सुरू करण्याबाबत त्यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना पदभार स्वीकारल्याचे कळविले होते. विशेष लेखापरीक्षक यांचेकडे स्पर्धेत भारत दिल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी आदेश काढले, पाटील यांनी करे यांच्याकडून पदभार स्वीकारला. एम. डी. पाटील यांच्या नंतर एन. डी. गाधेकर यांची सदर संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती जिल्हा उपनिबंधक काढणी केली. गादेकर यांनी सदर संस्थेची निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग सरकार पुणे यांना विनंती केली. सदर अंतिम मतदार यादीत वरील सर्व आरोपींची सदस्य नसल्याने त्यांचे नाव मतदार म्हणून नाव मतदार यादीत नव्हते.
दरम्यान, संस्थेचे कामकाज पाहत असताना निलेश रणजीत भोईटे आला व त्याने मला संस्थेचे माजी सचिव तानाजी भोईटे यांनी आपणास पुणे येथे बोलविले असल्याचे सांगितले त्याने संस्थेचे जुने रेकॉर्ड ते देणार असून ते आपण घेऊन जावे असे म्हणून तानाजी भोईटे च्या फ्लॅटचा पत्ता व फोन नंबर दिला. संबंधित बाब विजय पाटील यांनी त्यांचे भाऊ नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून पुणे येथे कोथरूड येथील हॉटेल किमया येथे येण्यास सांगितले. आम्ही तेथे पोहोचल्यावर हॉटेलच्या बाहेर निलेश भोईटे हा उभा होता. तो मला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला. तेथे वीरेंद्र भोईटे, तानाजी भोईटे, शिवाजी भोईटे, व रामेश्वर नाईक हजर होते. रामेश्वर नाईक याने तानाजी ला आपला विषय सांगा म्हणून सांगितले.
त्यावर तानाजी भोईटे विजय पाटील यांना म्हणाले की, सदरची संस्था गिरीश भाऊ यांना हवी आहे. ही संस्था आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहे. विजय पाटील व महेश नेत्या स्पष्ट नकार दिला. मी त्यांना संस्थेचे दप्तर कुठे आहे म्हणून विचारले असता निलेश भोईटे ने गिरीश महाजन यांना व्हाट्सअप वर व्हिडिओ कॉल लावला. यात गिरीश महाजन यांनी आपल्याला सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्थाही निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपवून टाक. विजय पाटील यांनी असे होणार नाही असे म्हणून त्यास नकार दिला. यावर विजय पाटील व महेश उठण्याचा प्रयत्न करू लागतात तानाजी भोईटे ने नाराज होऊ नका चला तुम्हाला रेकॉर्ड देतो असे सांगितले. त्यावर ठीक असल्याचे सांगून विजय पाटील व महेश बाहेर आले. त्यांच्यामागे वीरेंद्र, तानाजी, निलेश, शिवाजी, व रामेश्वर आले. हॉटेलच्या बाहेर कार आल्यावर वीरेंद्र नेमाझ्या गाडीची चावी निलेश ला द्यायला सांगितले. निलेशने त्यांच्याकडे आमच्या गाडीची चाबी घेतली. आणि मला व महेशला स्कोडा एम एच १४ बी सी ६००० या गाडीच्या मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. मी महेश व वीरेंद्र मागे बसलो व रामेश्वर पुढे बसला. शिवाजी भोईटे हा निलेश सोबत आला. तानाजी निलेश ला माझी गाडी घेऊन येऊ लागला. मोती सर्व एका फ्लॅट वर आम्हाला घेऊन गेले. तेथे अगोदरच जयवंत भोईटे, नीलकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनील झवर, विराज भोईटे उपस्थित होते. या मागोमाग निलेश भोईटे आला व त्याने दरवाजा बंद करू न घेता यावेळी लगेचच रामेश्वर नेमला डोक्याचे मागच्या बाजूस जोरात चापट मारली. व माझ्या मानेजवळ चाकू लावून मुकाट्याने बसून राहा अन्यथा ठार करून टाकू अशी धमकी दिली. महेशला सुद्धा रामेश्वरने मुकाट्याने बसण्यास सांगितले. आम्ही दोन्ही हा प्रकार पाहून भयभीत झालो होतो. त्यानंतर रामेश्वर ने गळाला लावलेला चाकू पोटाला लावला.
यानंतर सुनील झवर हा हॉलमध्येच मला दम देऊ लागला व संस्था सोडून द्या. मुकाट्याने सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन निलेश कडे देऊन टाक अन्यथा परिणाम वाईट होतील. गिरीश भाऊंनी यांना बसविले आहे हे तुला माहीत नाही का? गिरीश भाऊंचा खास माणूस आहे. यावेळी वीरेंद्र भोईटे ने मला पायावर लाथ मारली व नरेंद्रला सांग सर्व संचालकांचे राजीनामे द्या. रामेश्वर ने पुन्हा माझ्या कानशिलात मारली व हरामखोर, भडव्या असा तयार होणार नाही याला एमपीडीए लावू अशी धमकी दिली. याप्रकरणी प्रत्यक्षात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात ॲड. विजय भास्कर पाटील. यांच्याशी संपर्क साधला असता ते वकिलांकडे बसले असल्याचे सांगण्यात आले. गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला असता या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.